कोकेन तस्करीच्या आरोपावरु दोन भारतीयांना अमेरिकेत अटक

Foto
नवी दिल्ली : अमेरिकेत दोन भारतीय ट्रक चालकांना तब्बल ७ मिलियन डॉलर्स (सुमारे ५८ कोटी रुपये) किमतीच्या ३०९ पाउंड कोकेन तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतर, अंमली पदार्थ तस्करी आणि कॅलिफोर्नियाच्या ङ्गसँक्च्युरी पॉलिसीफवर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुरप्रीत सिंह आणि जसवीर सिंह, अशी आहेत. दोघेही भारतीय वंशाचे ट्रक चालक असून, ते सेमी-ट्रकद्वारे कोकेनची वाहतूक करत असल्याचा आरोप आहे.
अमेरिकेच्यानुसार, जप्त करण्यात आलेली कोकेन इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, ती सुमारे १ लाख १३ हजार अमेरिकन नागरिकांचा जीव घेण्यासाठी पुरेशी ठरू शकली असती.

कशी झाली कारवाई?

ही कारवाई एका हायवे निरीक्षणादरम्यान करण्यात आली. एका स्निफर डॉग युनिटने ट्रकमध्ये अंमली पदार्थ असल्याचा इशारा दिला. तपासादरम्यान ट्रकच्या स्लीपर बर्थमध्ये, लपवलेले अनेक कार्डबोर्ड बॉक्स आढळले, ज्यात मोठ्या प्रमाणात कोकेन होते. ही माहिती ५९ ने मिळवलेल्या कोर्ट रेकॉर्ड्सच्या आधारे समोर आली आहे.

अटकेनंतर काय कारवाई?

अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना पटनम काउंटी जेल येथे हलवण्यात आले आहे. इंडियाना स्टेट पोलिसांनुसार, दोघांवर गंभीर अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३२ शिकागो च्या अहवालानुसार, आरोपींवर डिपोर्टेशन होल्ड लावण्यात आला आहे. म्हणजेच जामिनावर सुटल्यानंतर त्यांना तात्काळ देशाबाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू होईल.

आम्हाला आत काय आहे, माहीत नव्हते

गुरप्रीत सिंह आणि जसवीर सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यांचा दावा आहे की, ट्रकमध्ये नेमके काय आहे, याची त्यांना माहिती नव्हती. त्यांच्या ट्रक कंपनीने त्यांना रिचमंडमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये ट्रक नेण्यास सांगितले होते. या दाव्याची सत्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहे.

अमेरिकेत कसे दाखल झाले आरोपी?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंह ११ मार्च २०२३ रोजी अ‍ॅरिझोना सीमेतून बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाला. तर, जसवीर सिंह २१ मार्च २०२३ रोजी कॅलिफोर्निया सीमेतून बेकायदेशीरपणे देशात शिरला. विशेष म्हणजे, जसवीर सिंहला गेल्या महिन्यात सॅन बर्नार्डिनो येथे चोरीची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी अटकही करण्यात आली होती.